Thursday, March 11, 2010

राहुलचे स्वयंवर...

मागच्या आठवड्यात राहुलचे स्वयंवर (पहिले श्वेता सिंग सोबत २००६ मध्ये) एकदाचे पार पडले। जवळ जवळ एक वर्षाच्या कालावधीनंतर या आगळ्या वेगळ्या स्वयंवराची सांगता झाली. कोलकाताच्या डिम्पी गांगुलीने राहुलला या स्वयंवरात जिंकले. तसं पाहिलं तर आपल्याला स्वयंवर हे काही नवीन नाही, मागे त्या राखीच झाला होतं... आणखी काळाच्या ओघात मागे गेलो तर... सीतामाईला श्रीरामाने स्वयंवरातच जिंकले होते... अर्जुनाने पाण्यात पाहून माश्याच्या डोळ्याचा वेध घेतला व द्रौपदीला जिंकले. पुरातनकाळातील स्वयंवर हे स्त्रियांना जिंकण्यासाठी होतं... पण काळाच्या ओघात आता उलटे घडत आहे... राहुलला या स्वयंवरात जिंकण्यासाठी अनेक मुलींनी आपला प्राण पणाला लावून लढल्या (नाचल्या, गायल्या आणि बरेच काही... ज्यांनी पाहिलं आहे त्यांना विचार पुढलं) राहुल महाजनच खूप कौ"थुक" करेल तितके कमीच आहे, तिकडे आपल्या काकांचा (प्रवीण महाजन...भलेही त्याने राहुलच्या वडिलांचा खून केला असेल) मृत्यू झाला असताना देखील ह्या पट्ट्याने मात्र आपल्या स्वयंवरात कोणतेही विघ्न येऊ दिले नाही। घरातलं माणूस गेल्यानंतर आपण महिनाभर तरी सुतक पाळतो... पण राहुल महाजनला मात्र या गोष्टीशी काहीही घेणा देणा दिसत नाही। कधी कधी वाटतं बरं झालं प्रमोद महाजन लवकर गेले नाहीतर आपल्या "कु"पुत्राच्या कुरापतिनी त्यांना मेल्याहूनही मेल्यासारखे झाले असते. जर प्रमोदजी वरून बघत असतील तर ते अक्षरश रडत असतील. बाप गेल्यानंतर लगेच ह्या पोराला कोकेन व गांजा अशा अमली पदार्थांच्या सेवनासाठी पोलिसांनी अटक केली... श्वेता सिंघशी लग्न केले पण लगेच दीड वर्षाच्या आत घटस्फोट घेतला... मग याच्या पुढे जाऊन बिग बॉस व नंतर कळस म्हणजे स्वताचे स्वयंवर रचले. कधी कधी वाटत कि खरच मी खूप भाग्यवान आहे कि एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. भले आम्ही त्याच्या येवढा पैसा कमवू शकत नसलो तरी आम्ही ताठ मानेने जगतो. कोणालाही आमच्याकडे बोट दाखवण्याची संधी देत नाही.

No comments:

Post a Comment