राजगड... हिंदवी स्वराज्याची जवळ जवळ २६ वर्षे राजधानी... गडांचा राजा...
मी कोणत्याही देवाला मानत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज माझ्यासाठी देवापेक्षा कमी नाहीत. भारतातील प्रत्येक गड जो महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे, त्याला मी मंदिर मानतो. मागच्या शनिवारी अचानक ठरवला कि, आपण रविवारी राजगड किंवा तोरणा गडावर जायचं (दोन पर्याय ठेवले कारण मला माहित नव्हते कि दोहोपैकी कोणता गड जवळ आहे. विकीपेडिया वरून रस्त्याची माहिती काढली. रविवारी सकाळी नऊच्या सुमारास वाकडच्या पुलाखालून बंगळूरूला जाणाऱ्या एका ट्रकमध्ये बसलो (बहुतांश लोक आश्चर्यचकित होतात, जेव्हा मी त्यांना सांगतो कि, मी ट्रक किंवा बसने प्रवास करतो)। ड्रायव्हरला २५ रुपये दिले व मुंबई - बेंगळूरू महामार्गावर नारायणपूर येथे उतरलो. मग तेथून जीपने वेल्हे गावाला जायचे म्हणून निघालो पण गाडीत एका शाळकरी मुलाने सांगितले कि मार्गासनी येथून सुद्धा रस्ता आहे व तेथे उतरलो। मार्गासनी येथून राजगड आणकी ८ किमी दूर होता. गडाकडे जाण्यासाठी एकही वाहन उपलब्ध नसल्यामुळे मी एकटाच चालत निघालो. दुपारचं रखरखत उन आता जाणवायला लागला होता. सोबत पाण्याची बाटली घेतली होती पण पाणीच घ्यायचं राहिला होता. एक दोन किमीचे अंतर चालल्यानंतर एक ओढ लागला, पोहण्याचा मोह झाला पण मनाला आवर घातला. थोडा पुढे गेल्यानंतर आणखी एक ओढ लागला, तिथे पाण्यात काही मुले खेळत होती, त्यांच्याशी थोड्या गप्पा मारल्या व त्यांचा एक फोटो काढला. तहानेने खूप व्याकूळ झालो होतो. एक लहान मुलगा (आरिफ) व त्याची बहिण (आयशा) पाणी आणण्यासाठी निघाले होते, मी बिस्कीटचा पुडा काढला आणि त्या दोघांनाही बिस्कीट दिले. मग त्या लहान मुलाने मलापण बाटलीत पाणी आणून दिले. त्या दोघा भावंडांचाही एक फोटो काढला व मी पुढे निघालो. नंतर 'साखर' नावाच्या गावात बिस्कीट व पापड्या खाण्यासाठी घेतल्या. काही अंतर चालल्यानंतर एक शेतकरी कारवड (लहान गाय) घेऊन शेताकडे निघाला होता. मग त्यांच्याशी गप्पा मारत मी हि निघालो. ते सांगत होते कि, सरकारने सर्व किल्ले व गड यांचे पर्यटनाच्या दृष्टीने विकास केला पाहिजे. डोंगराच्या उतारावर नवीन झाडे लावली पाहिजेत व जुन्या झाडांची कत्तल रोखली पाहिजे. आजूबाजूला रस्त्याचे कडेने, शेतात अशा प्रकारची झाडे पहिली कि, ज्यांना लाल भडक रंगाची फुले आहेत आणि एक सुद्धा पण नाही. जेव्हा मी एक शेतकऱ्याला विचारले तेव्हा त्याने सांगितले कि, ती 'सोयरी'ची झाडे आहेत. दुपारी एकच्या दरम्यान मी गुंजवणे (राजगड पायथा) येथे पोहोचलो। परंतु तेथे क्षणभरदेखील न थांबता तसाच गड चढण्यास सुरुवात केली. रस्त्याचे कडेला काही सुतार काम करीत बसले होते, त्यांनी विचारले कि, 'मी एकटाच एवढ्या ऊनात गडावर निघालो आहे का?'. मी हो म्हटल्यानंतर त्यांनी मला गडावर जाण्याचा एक जवळचा रस्ता सांगितला व त्या रस्ताने मी पुढची वाटचाल करू लागलो. थोड्याच वेळात उनामुळे व चढण खूप असल्यामुळे खूपच थकवा जाणवू लागला. एक म्हातारी आजी लिंबू शरबत विकत बसली होती. मी तीन रुपयांचे लिंबू शरबत पिऊन पुढे निघालो. आणखी थोडा चालल्यानंतर परत थकवा जाणवू लागला। एका झाडाच्या थंड सावलीखाली पहुडलो. काहीवेळाने तेथे गड उतरत तीन लहान मुले आली व माझ्याकडे पाणी आहे का विचारले. थोडसं पाणी होता ते त्यांना दिलं, खूप समाधान वाटलं... पण स्वताची थोडी चीडही आली कारण मला अजून भरपूर चालायचा होता आणि पाणी तर मी त्या मुलांना देऊन टाकलं होतं. काहीवेळाने दोन तरुण पळत पळत गडाकडे निघाले होते, त्यांच्याकडून थोडीशी स्फूर्ती (Inspiration) घेऊन मी हि चालत निघालो व किल्ल्याखाली येऊन पोहोचलो. आता माझ्यापुढे ह्या चढाईचा सर्वात अवघड रस्ता होता। हा शेवटचा दरवाजापर्यंत नेणारा २५ ते ३० मीटरचा रस्ता ८० ते ९० अंश कोन इतका सरळ उभा होता. दुपारी तीन वाजता गडावरती पोहोचलो (पद्मावती माची). तेथील एका टाक्यातील पाणी प्यायलो, फ्रीज मध्ये जसे पाणी थंड असते तसे पाणी थंड होते. तेथून गडावरील अंबरखाण्याकडे गेलो व तिथे आदोध्याला गार सावलीत आराम करायचे ठरवले व आडवा झालो. तिथे अगोदरच चार अनोळखी तरुण मुले गप्पा मारत बसली होती (पण नंतर ते माझे मित्र बनणार होते...). साडे पाचच्या सुमारास ते चौघेही सुवेळा माची पाहण्यासाठी निघाले होते आणि मग त्यांनी मलाही सोबत येण्यासाठी आमंत्रण दिले आणि मी हि आनंदाने निघालो। जेव्हा मी त्यांना सांगितला कि मी एकटाच ट्रेकिंग करतो, ते अस्चार्याचाकीत झाले, कि मी मित्रांशिवाय कसा काय एकटा फिरू शकतो (पण इथेच तर खरी गोम आहे... मित्रांसोबत तुम्ही फिरलात तर नवीन मित्र भेटत नाहीत, पण तुम्ही एकटे फिरत असाल तर तुम्हाला भरपूर नवीन मित्र भेटतील, नवीन माहित मिळेल) सुवेळा माचीवरील हत्तीचं म्हणजे एक विलक्षण नैसर्गिक आश्चर्य आहे. एवढ्या मोठ्या खडकात एक वेज (hole) आहे. तिथे आम्ही (पुष्कर, मंदार, किशोर, गिरीश) बसलो असताना एक माकड आले कारण आमच्याजवळ एक केकची पिशवी होती, ती त्याला हवी होती। आम्ही त्याला घाबरून, ती पिशवी त्याच्या हवाली केली व सुवेळा माचीच्या कड्याकडे निघालो. त्या कड्यावरून खूपच विहंगम दृश्य होते... सर्व बाजूनी डोंगर व दरी... उजव्याबाजूला कुठल्यातरी धरणाचे पाणी होते... ते दृश्य अजूनही माझ्या डोळ्यासमोर उभे राहते. अंधार होण्यापूर्वी आम्ही परत पद्मावती माचीकडे निघालो व जाताना म्यागी व चहा करण्यासाठी जळण गोळा केले. आमचा मुक्काम पद्मावती मंदिरात होता. सर्वजण ताजेतवाने झालो व चौकडीने (पुष्कर, मंदार, किशोर, गिरीश) यांनी घरून जे काही खायला आणले होते त्यावर तुटून पडलो। मी जेवणासाठी गडावरील एका माणसाला पैसे दिले होते पण तो गायबच झाला. मग आम्ही चहा करायचा ठरवला पण लफडा असा झाला कि आम्ही आणून ठेवलेला जळण काही मुंबईकारणी होळी पेटवण्यासाठी वापरले. पुष्कर तर त्यांच्यावर चांगलाच भडकला होता, मग परत अंधारात एक छोटी ब्याटरी व मोबाईलच्या प्रकाश जळण गोळा केले व चहाच्या तयारीला लागलो. कशीबशी चूल पेटवली व खूप खटाटोप करूनही चहाला काही उकळी येत नव्हती. हा चहा बनवण्यात मंदारने सर्वात जास्त कष्ट घेतले, चुलीतील धुरामुळे बिचाऱ्याच्या डोळ्यातून अक्षरशा पाण्याच्या धारा वाहू लागल्या होत्या। शेवटी एकदाचा आमचा चहा तयार झाला। नन्तर आम्ही सर्वांनी चहा आणि खारी खाल्ली. काही हौशी लोकांनी एक लाकडाचा मोठा ओंडका आणून त्याला पेटवून होळी सुरु केली होती. पौर्णिमेचा चंद्र आकाश चांगलाच वर आला होता... त्याचा थंड प्रकाश मनाला सुखावून जात होता. कोठेतरी दूर डोंगरावरती वणवा लागला होता (कि लावला होता...देवा जाने)...जवळच्या गावातून ढोल व ताशांचा आवाज येत होता... त्या वातावरणांत धुंद होऊन जावं असं वाटत होतं... परत न येण्यासाठी... आम्ही सर्वजण गप्पा मारत बसलो. खूप मजा आली. पुनवेच्या प्रकाशात आजूबाजूचा परिसर अंधुक अंशुक दिसत होता. सिंहगडावरच्या मोबाईलच्या टोवरवरील बल्ब ब्लिंक होत होता. तोरणागड तर बाजूलाच उभा होता. राजगडावर येण्यासाठी दोन मुख्य वाट आहेत... पाली दरवाजा (पाली गावातून) आणि चोर दरवाजा (गुंजवणे गावातून), या दोन्ही रस्त्यांवर सौर उर्जेवर चालणार दिवे लावले होते... रात्रीच्या अंधारात त्या दिव्यांचा पांढरा प्रकाश चांगलाच उठून दिसत होता. रात्री १२ च्या सुमारास आम्ही झोपण्यासाठी निघालो. पण माझ्याकडे तर अंथरून किंव्हा पांघरूनही नव्हते. पण चौकडीने मला एक शाल दिली पांघरण्यासाठी. मला माहित नाही माझे काय झाले असते त्या कडाक्याचे थंडीत, जात ती चौकडी मला भेटली नसती तर. जेव्हापण मी राजगडावर जाईन मला चौकडीची आठवण नक्की येईल.दुसऱ्या दिवशी पहाटे पाचच्या दरम्यान उठलो व प्रातविधी आटपून पहाटेच्या अंधुक प्रकाशात बालेकिल्ल्याकडे निघालो (आमची चौकडी मात्र अजूनही झोपली होती कारण ते आरामात दुपारच्यावेळी गडावरून खाली उतरणार होती).सकाळी एवढ्या लवकर उठलो कारण मला दुपारी ऑफिसलापण पोहचायचे होते. सूर्य अजून उगवला नव्हता, पूर्वेकडे थोडसे ढग होते ज्यामुळे आकाशात रंगांची उधळण दिसत होती. मी बालेकिल्ल्यावर पोहोचेपर्यंत सूर्य उगवायला लागला होता. वरती सगळीकडे फिरलो व थोडेसे फोटोही काढले (सूर्योदयाचे व आजूबाजूच्या सुंदर निसर्गाचे...) नंतर खाली उतरून पद्मावती माचीवर आलो. आमच्या चौकाडीसाठी एक चिट्ठी लिहिली व निघालो. पण जाताना मला मंदार व किशोर पद्मावती तळ्यावर भेटले. त्यांचा निरोप घेऊन मी गड उतरण्यास सुरुवात केली. नऊच्या सुमारास मी पायथ्याला पोहोचले, थोडावेळ एखादे वाहन जाते का पहिले पण एक वहान दिसले नाही त्यामुळे परत एकदा पायीच निघालो. साखर गावात पोहोचलो असता मागून येणाऱ्या एका कारने (SANTRO) मला मार्गासनी पर्यंत सोडले. मला वाटत ते कुटुंब मुंबईहून राजगडला भेट देण्यासाठी आलं होतं. मी गडावर खाली उतरताना त्यांच्या पुढे खाली आलो होतो. मार्गासनीहून जीपने नारायणपूर व तेथून कात्रजला आलो. कात्रजला बसथांब्यावर थांबलो होतो तेव्हा एका माणसाच्या हातात असलेल्या वर्तमानपत्रात वाचला कि भारताने पाकिस्तानला हॉकी सामन्यात हरविले होते. मग मीहि 'सकाळ' घेतले व ती बातमी वाचली (तुम्हाला विश्वास बसणार नाही पण रात्री माझ्या स्वप्नातहि भारताने पाकिस्तानला ४-१ अशा गोल फरकाने पाकिस्तानला हरविले होते). तेथून टमटमने वाकड व हिंजवडीला आलो. दुपारी दोनच्या दरम्यान ऑफिसला पोहोचलो.
Nice. Gadapeksha Manasa n che nirikshan avadale.
ReplyDeleteKhupacha Chan Trip Zali....Aani Bhetlele Mitra Tar Tyahun Chan.....
ReplyDelete